दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद लातूर यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 अंतर्गत रेणापूर तालुकास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धा नुकत्याच जनता विद्यालय पोहरेगाव येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात जि.प.प्रा. शा.व्होटी नं.1 शाळेच्या मुलांच्या संघाने अटितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जनता विद्यालय पोहरेगाव संघाचा पराभव करत सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला.. तर या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात जि.प.प्रा. शा.व्होटी नं.1 शाळेच्या मुलीच्या संघाने एकतर्फी अंतिम सामन्यात जनता विद्यालय पोहरेगाव संघाचा पराभव करत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.. या शाळेच्या दोन्ही विजयी संघास शाळेतील सहशिक्षक श्री माधवराव जी. कांबळे , श्री तुकाराम पलमटे , यांनी मार्गदर्शन केले होते या विजयी संघाचे कौतूक रेणापूरचे गटशिक्षणाधिकारी विशाल दशवंत , विस्तार अधिकारी गोविंद पुरी , केंद्रप्रमुख डी. व्ही. भिकाणे , केंद्रीय मु.अ पी. बी. बडे , शा. व्य. समितीचे अध्यक्ष राजेंद्र केदार , सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व शाळेतील शिक्षक उगिले पांडुरंग सर, पलमटे डी. डी. , सुभेदार जी.बी. कोयाडे वाय.आर. ,सिरसाट ए.बी. यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेत व्होटी शाळेचा संघ रेणापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.