दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
थंडीमुळे आज बर्फही
थोडा गारठलाच होता
त्याच्या गारठ्यानेच
अंगात शिराशिरी भरली होती
हवाहवासा गारठा
अन कुडकुडणारी थंडी
कुड़कुडणाऱ्या थंडीत
उबदारपणा शेकोटीचा
अंगावर फूल स्वेटर अन
कानावर उबदार टोपी
बोचणाऱ्या थंडीतला
हवा नकोसा गारवा
आठवांचा उजाळा घेत अन
उलगडता आठवणींचा खजिना
या थंडीला काय झालंय बरं?
निसर्ग बदलला का अचानक
आजकाल त्याचा पुर्वीसारखा
काही भरवसा राहीलाच नाही !
गप्प गुमान चादरीत लपेटून
अंगावर जाड शाल ओढून
मऊशार लोकरीचा मफलर
गळ्याभोवती गुरफटून
या दंवदार, या थंडगार
गारठ्याचे स्वागत करूया !
मनोमन गारठलेल्या मनाने
मनोमन चिंब गारठ्याने
मनमुराद गारठ्याच्या आल्हादाने
दातांवर दात वाजत असतांना
कडकड कडकड होणाऱ्या आवाजाने
अन ……………………..
अगदी अंग आक्रसुन
मोळी केलेल्या देहातून
थंड गारव्याची अनुभुती
या नव नव्या थंडीत
अनुभवूया का ?
या गोड गुलाबी थंडीत
गारठ्याचे स्वागत करूया का ?
R सुनिल शरद चिटणीस
खेड – रत्नागिरी
२१ / नोव्हेंबर / २२