दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
_______________________________________
विकासाच्या विविध मुद्द्यांवर ही केली चर्चा
नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मंजूर झालेल्या 33 केव्ही उपकेंद्र उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासोबतच वाडी बु. येथील मंजूर केलेल्या रुग्णालयासंदर्भात आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर, महावितरण चे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण, कार्यकारी अभियंता स्थापत्य गिल्लुरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हंचाटे, जावेद, महेश वाघमारे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करता यावा. कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा मिळाल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार नाही. शिवाय हिंस्रपशुंच्या हल्ल्यांपासूनही त्यांचा बचाव होईल या अनुषंगाने राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर वीज ऊर्जा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे . नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये नव्याने 33 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आली परंतु या उपकेंद्रासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्यात आलेली नाही तर काही ठिकाणी नव्याने 33 केव्ही उपकेंद्र सुरू करणे आवश्यक आहे . या सर्व अनुषंगाने आज आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
नांदेड उत्तर मतदार संघातील शहरी भागातील मालटेकडी, देगलूर नाका येथे 33 के.व्ही.चे नवीन उपकेंद्र मंजूर आहेत. तसेच मौजे मरळक, नेरली या ठिकाणी मंजूर असलेल्या नवीन 33 के.व्ही.उपकेंद्रांना जागा उपलब्ध करुन देणे. सुगाव, नसरतपूर, तरोडा (जुना) येथे 33 के.व्ही. चे नवीन उपकेंद्र मंजूर करणे पासदगाव ता.जि.नांदेड येथे 132 के.व्ही. चे उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. वाडी (बु.) येथील रुग्णालयासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी, इटनकर यांनी 10 एकर जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांपैकी 5 एकर जागा रुग्णालय इमारतीसाठी आणि 5 एकर जागा कर्मचारी/अधिकारी निवासासाठी उपलब्ध करण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना अंतर्गत प्रकल्पांसाठी शासकीय/ग्राम पंचायत जमिनी उपलब्ध करुन देणे . यासह मंजूर झालेल्या 33 के.व्ही. उपकेंद्र मौजे लिंबगाव, नाळेश्वर, निळा, रहाटी, पावडेवाडी, तळणी, आणि 33 व 11 के.व्ही. उपकेंद्र कासारखेडा यावर चर्चा करण्यात आली दरम्यान बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांना मिळालेल्या मावेजा धर्तीवर मावेजा मिळावा यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून दासराव हंबर्डे यांची उपस्थिती होती .आ. बालाजी कल्याणकर यांनी आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या अनुषंगानेही जिल्हाधिकाऱ्याची चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत.