दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – ग्रामीण रुग्णालय लोहा येथील बाहय रुग्णसेवा विभाग हा उपजिल्हा रुग्णालयात न स्थलांतर करता ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत येथेच चालु ठेवावा आशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा खा प्रतापराव पा चिखलीकर यांचे विश्वासू सहकारी भास्कर पाटील पवार यांनी केली आहे. लोहा शहरातील देवणेवाडी फाट्यावर नवीन बांधकाम झालेले उपजिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण रूग्णालयाचे स्थलांतर होणार असुन लोहा शहराची 30 ते 35 हजार लोकसंख्या असुन ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णाची मोठी संख्या आहे या सर्व गोष्टींचा विचार करता बाहय रुग्ण विभाग हा ग्रामीण रुग्णालयाच्या जुनी इमारती ठिकाणीच ठेवावा . नवीन उपजिल्हा रुग्णालयाची इमारत शहरा पासून जवळपास 3 किमी अंतरावर असल्यामुळे बाह्य रुग्णांना अडचण होईल.
यामध्ये बाहय रुग्णामध्ये गौरगोरीब, वयोवृद्ध , अपंग, विद्यार्थी, बालरुग्ण अशा सर्व रुग्णांना नवीन इमारत येथे जाणे न परवडणारे आहे. या सर्व बाबींचा विचार करता बाहय रुग्ण विभाग (OPD) हा ग्रामीण रूग्णालयाच्या जुन्या ईमारतीतच चालु ठेवावा अशी मागणी नगरसेवक भास्कर पा पवार यांनी केली आहे.