दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- शहरातील इंदीरा नगर येथे सर्व धर्मीयांच्या वतीने हजरत शहीद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतीमेचे पुजन पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड,एम.आय.एम.तालुका अध्यक्ष यजाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवा,निळा,हिरवा ध्वजारोहण समाजसेवक आसिफ जमादार , दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदीरानगर येथिल तरुणांचे सर्व धर्मीयांच्या या सामाजिक एकता कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाजात वावरत असताना सामाजिक सलोखा राखने गरजेचे आहे असे यावेळी इंदीरानगर येथिल तरुणांच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक कुंभार सर,तालुका अध्यक्ष यजाज काझी ,शहर अध्यक्ष फिरोज पठान , दत्ता बोंबले, हुसैन शेख, आलिम शेख, फारुक शेख, मुगाजी थोरात, अकबर शेख, माजी नगरसेवक राम वारे, कलीम शेख, समशेर पठाण, इरफान हकिम आदी यांनी परीश्रम घेतले.