दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
—————————————-
पुणे– आज संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टी तर्फे संविधान जनजागृती अभियान बाईक रॅली काढण्यात आली होती. सकाळी ११.०० वाजता कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार घालून ५५ किलोमीटर असा संपूर्ण पुणे शहराला वेढा घालत पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार घालून रॅली संपन्न झाली
यावेळी मा. विजय कुंभार सर (महाराष्ट्र राज्य संघटक, पुणे शहर कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरातील शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी सहभाग घेतला होता
26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून दिले. या संविधान दिनानिमित्त आप आदमी पार्टी पुणे शहर यांनी कोथरूड येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन संविधान रॅली सम्पूर्ण पुणे शहरात फिरून,शेवटी पुणे स्टेशन येथे भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान रॅलीची सांगता झाली.