दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी- श्री, रमेश राठोड
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
यवतमाळ येथे आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन जिल्हा परिषद च्या श्री वसंतराव नाईक सभागृहामध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कास्ट्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित करण्यात आला. कास्ट्राइब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोविंद इंगोले यांनी प्रास्ताविकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र समजून घेतल्यास सविधान समजणे सोपे जाईल तसेच संविधान हे सर्व समावेशक आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी मा. विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. पंकज भोयर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मा प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्रीमान कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग,मा पियुष चव्हाण, समाज कल्याण अधिकारी मा.आनंद भगत महासंघाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक श्री सुभाष कारुनीक यांनी रशिया पाकिस्तानचे विभाजन आणि भारतीय संविधान या विषयावर सविस्तर विवेचन केले. संविधानामधील सर्व तरतुदीचे पालन करणे आणि संविधान अंमलबजावणी करणे यावर संपूर्ण अवलंबून असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रबोधि घायवटे सर, यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजकुमार उंमरे, अध्यक्ष वनविभाग तथा राज्य उपाध्यक्ष,सिद्धार्थ भवरे, विभागीय अध्यक्ष अमरावती,प्रदीप भगत, राजेंद्र खरतडे, जितेंद्र बागेश्वर, सुनील वनकर, सुहास परेकर, प्रशांत भगत, तुषार आत्राम, कास्टाईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, रामदास चंदनकर, पंडित, स्वप्निल फुलमाळी, अतुल पेटकर, यांचे सह जिल्हा परिषदेमधील अनेक संघटनांचे अध्यक्ष, सचिव सभासद व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव भारत भितकर यांनी मानले.