दैनिक चालू वार्ता अहमदपूर प्रतिनीधी-
अहमदपूर नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेच्या जागेवर कार्यरत असलेले अतिक्रमण काढण्यास आज सुरुवात केली असून अतिक्रमण केलेल्या आस्थापना चालकांना कायदेशीर नोटीस यापूर्वी बजावण्यात आल्या होत्या .नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आस्थापना चालकांनी high court औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर high कोर्टाने सदर कार्यवाही करिता stay देण्याचे आदेश देण्यात आले होते,परंतु नगरपालिका प्रशासनाने त्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे मत आस्थापना चालकांनी व्यक्त केले..पालिका प्रशासन तुघलकी पद्धतीने अतिक्रमण हत्वत असून पिढीजात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विश्वासात न घेता सदर कार्यवाही करण्यात आली असल्याचे एकमत व्यावसायिकांनी व्यक्त केले.सदर जागेवर नगरपालिका कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारणी करणार असून त्यानंतर सदर व्यवसायिकांना दुकाने देण्याचे निर्णय शासन स्तरावर घेतले जातील असे मत नगर पालिका आयुक्तांनी व्यक्त केले..