दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी –
वाशीम – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. विदर्भातील संघटन मजबूत करण्यासाठी ठाकरे विदर्भात पोहचले.
मात्र ठाकरेंचा दौरा सुरू असतानाच ठाकरे गटातीलमतभेद विकोपाला गेल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशिमच्या महिला शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेना शहरप्रमुख रंजना पौळ यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी भरदिवसा चाकू हल्ला केला. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याची पोलिसांनी तातडीने दखल घेत वाशीम शहर पोलिसांत ऍट्रॉसिटी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून घेतला होता.
या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.