दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – खा हेमंतभाऊ पाटील यांचा वाढदिवस नांदेड दक्षिण ग्रामीण मतदारसंघात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
बेटसांगवी येथे गोदावरी काठावर प्राचीन असलेले कपिलेश्वर मंदिर येथे सकाळी कार्यकर्त्यांनी खा हेमंतभाऊ पाटील यांना जनसेवेसाठी दिर्घायुष्य लाभावे म्हणून कपिलेश्वर चरणी रूद्रभिषोक व आरती करून प्रार्थना केली. जवळा ( देशमुख ) येथे हनुमान मंदिर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांचा वसा चालवत नांदेड दक्षिणच्या ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी खा हेमंतभाऊ पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमान सुदामराव मोरे(सर्कलप्रमुख) बाळासाहेबांच्या शिवसेनेचे युवा नेते श्रीमान सोपानराव मोरे, ता.समन्वयक श्रीमान रामाकिशन नरवाडे, एकनाथ कापसे ,मा.सरपंच दिलीप गवळी (छावा जिल्हाध्यक्ष) ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पावडे, बापुराव गवळी ,अण्णाराव पावडे , संजय पावडे, सुदाम पा बुद्रुक हिराकांत पा बुद्रूक, उध्दव पा.बुद्रूक , गोविंद पा बुद्रूक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.