दैनिक चालू वार्ता मुखेड- शिवकुमार बिरादार
तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या दुस-या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून दि.२० डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या निकालानुसार मौजे बोरगाव येथील जनसेवा ग्रामविकास हे पॅनल प्रचंड बहुमताने विजयी झाले असून गावच्या सरपंचपदी सौ. अनराधा परबतराव इंगळे यांची निवड झाली आहे.
मागील कार्यकाळात विरोधी पॅनलच्या नाकर्तेपणाला पर्याय म्हणून गावातील एक निस्वार्थी नागरिक परबतराव गंगाधरराव इंगळे यांनी जनसेवा ग्रामविकास पॅनलची उभारणी करून आपल्या संकल्पनेनुसार कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तसेच दुरदृष्टीपणाचा अवलंब करून पत्नी सौ. अनुराधा इंगळे यांंना सरपंच पदासाठी तर सदस्य पदासाठी उभे करण्यात आलेले सौ.मैनाबाई प्रभाकर शिंदे, माधव यादव वाघमारे व पूजा सचिन श्रीरामे हे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून आले असून शिला त्र्यंबक श्रीरामे व धोंडीबा माणिका श्रीरामे यांनी निवडणूक लढवली आणि सदर निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार हे बहुमतांनी विजयी झाले असून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले सुरेश व्यंकटराव शिंदे याच्या पत्नी सौ.जयश्री सुरेश शिंदे यांचा पराभव केला.
या निवडीबद्दल पॅनल प्रमुख परबतराव गंगाधरराव इंगळे, सरपंच सौ.अनुराधा परबतराव इंगळे यांच्यासह सर्व विजयी सदस्यांचे गावकरी व समर्थकांच्या वतीने अभिनंदन होत आहे व सर्वांना पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.