दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव माजी आमदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा.भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांचा वाढदिवस दिनांक 28 डिसेंबर बुधवार या रोजी असून त्यांनी स्वतः च्या शब्दात कार्यकर्त्यास तथा जनतेस व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यास पुढील प्रमाणे आव्हान केले आहे मी 91 वे वर्ष पूर्ण करून 92 व्या वर्षात पदार्पण करीत आहे अर्थात माझा वाढदिवस दरवर्षी तो मी माझ्या राहत्या घरीच साजरा करत असतो .परंतु यावर्षी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक , संचालक व आमचे नेते डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब हे आजारी असुन औरंगाबाद येथे ते सध्या उपचार घेत असल्याने यावर्षीचा माझा 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसाचा कार्यक्रम मी पूर्णतः रद्द केला आहे.
माझे सर्व मित्र व सहकारी ,कार्यकर्ते श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधारचे सर्व प्राचार्य , प्राध्यापक बंधु , भगिनी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा कार्यकर्ते व सर्व जनतेस विनंती आहे. आपण प्रत्येक्ष माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या घरी कोणीही भेटीस येऊ नये. फोनवरून तथा सोशल मिडीया व्दारे शुभेच्छा व सदिच्छा द्याव्यात . मी आज पर्यंत आपल्या सदिच्छा मुळेच टिकुन आहे अशाच शुभेच्छा व सदिच्छा कायम माझ्या पाठीशी असाव्यात ही विनंती.
आपलाच विश्वासू,
गुरूनाथ माणिकराव कुरूडे कंधार
मा.आमदार,स्वातंत्र सैनिक,
सचिव ,
श्री शि.मो.ए.सो.कंधार