दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
वसमत ः:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले महिला बचत गट बगाडी मळा रविवार पेठ वसमत येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले . प्रमुख पाहुणे समतादूत मिलिंद आळणे ,गुरुनाथ गाडेकर ,अस्मिता गव्हाणे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य कार्यावर प्रकाश टाकला. भारतातील पहिली महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी कवयित्री समतेची प्रेरणा समाज सुधारक स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगेमनेरकर ,आराध्या गोरे, मंंगल गोरे ,वैशाली गोरे ,अनिता सातव ,पुष्पा इंगोले ,लता हरकळस शेवटी आभार प्रदर्शन सीमा गोरे यांनी केले याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.