दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
देगलूर येथील जुने तहसील कार्यालया जवळ सिंधू महाविद्यालय येथे दि. 3 जानेवारी रोजी. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य.ए.बी.सिताफुले सर, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव, अशोक दाचावार, प्रा. मिलिंद राजुरकर,
प्राध्यापिका बुनावार मॅडम या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे अध्यक्षांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले, यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्राध्यापिका बुनावार मॅडम म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांची कार्य समाजातल्या प्रत्येक महिलांनी अंगीकारणे काळाची गरज आहे, कारण सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक महिलांना शिक्षित करण्याचे काम त्यांनी केले, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार दिला पण एकेकाळी स्त्रियांना मूल आणि चूल इतकच कार्य करावे लागत होते पण सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीमुळे 21 व्या शतकातील महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षित होण्याचे व आपले ध्येय साध्य करून मोठमोठ्या पदावर जाण्याचे भाग्य सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्यामुळे मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वजीरे सर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. तरी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा आगलावे मॅडम यांनी केले,या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.