दैनिक चालु वार्ता- अतुल दंढारे
नरखेड: 04
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील एम. ए.मराठी पदव्युत्तर विभागाचे तीन विद्यार्थांनी उन्हाळी २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत एम. ए. मराठी या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्त केले, या गुणवत्ता यादीत प्रथम मेरिट सोमराज पुंडलिक गिरडकर,चौथा मेरिट भावेश अजाबराव चरपे तर कु. आशिका मधुकर जाने हिने गुणवत्ता यादीत पाचवे स्थान प्राप्त केले, यशस्वी विद्यार्थांना मार्गदर्शक म्हणून डॉ. धनराज सावरकर, प्रा. अमित नांदगावे, प्रा. संगीता ढोले यांनी केले, या विद्यार्थांचे अभिनंदन व्हीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष रणजीतबाबूजी देशमुख, संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे, कार्याध्यक्ष डॉ.आशिषबाबू देशमुख, कार्यवाह श्री.युवराजजी चालखोर, महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. साधना जिचकार, डॉ. रिता डंभाळे व सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.