दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनानिमित्त मुखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास गोबाडे व उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते दैनिक चालू वार्ताचे विमोचन करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा मुखेड पोलीस स्टेशन तर्फे सन्मान करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दैनिक चालू वार्ता चे सुरेश जमदाडे व शिवकुमार बिरादार यांची दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राची तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल मुखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास गोबाडे व उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राचे विमोचन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास गोबाडे व उपनिरीक्षक नरहरी फड, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी अण्णा कोनापुरे, पत्रकार संघाचे सचिव विजय बनसोडे, दैनिक समीक्षा चे तालुका प्रतिनिधी जगदीश जोगदंड, मीडिया फोटोग्राफर गणेश आंबेकर इत्यादी उपस्थीत होते.