दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:सांगली जिल्ह्यातील कारवाई करून लॅब सील केली होती. त्यामुळे २५ हजार लॅब चालकाची एकच खळबळ उडाली होती, ही कारवाई चुकीची असल्याची माहिती भूम, परंडा, वाशी तालुक्यातील लॅब धारकांनी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांना दिली. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना कळवली.कारवाईमुळे राज्यातील अनेक टेक्निशियन अडचणीत येणार होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी तत्काळ याबाबतची माहिती घेऊन ही कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले. माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यामुळे लॅब टेक्निशियन यांना न्याय मिळाला. लॅब चालकावर झालेल्या चुकीच्या कारवाई प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडून न्याय मिळवून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांचा लॅब चालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी दत्तात्रय घुले, सुजित जरडकर, कुमार पाटील, रवींद्र वनवे, भाऊसाहेब मोरे तसेच लॅब टेक्निशियन उपस्थित होते.