दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी: -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रदिप ठक्करवाड यांनी प्रसुती दिनांकाच्या विस दिवस अगोदरच मनिषा प्रभाकर दिली. शिंदे हिची प्रसुति शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीची केल्यामुळे मनिषा प्रभाकर शिंदे हिस आपला प्राण गमवावा लागला व हिच्या पतिकडून बारा हजार रुपये घेऊन मानसिक छळ केल्यामुळे देगलूर तालुक्यात अनेक मोर्चे काढण्यात आले होते, त्यामुळे मयत मनिषा व तिच्या कुटूंबीयांना न्याय मिळावा म्हणून डॉ. प्रदिप ठक्करवाड
यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी
तसेच देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटाच्या नविन इमारत बांधकामास अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ मध्ये मान्यता देऊन निधी उपलब्ध द्यावे व ५० खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे आपल्या निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देगलूर बिलोली मतदार
संघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी मागणी केली.