दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड -प्रतिनीधी अंगद कांबळे
म्हसळा – नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या नियमानुसार व मार्गदर्शनाखाली,दिव्यांग योगासन स्पोर्ट्स कमिटी तर्फे पहिली दिव्यांग रायगड जिल्हा योगासन स्पोर्टस स्पर्धा दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ वेळ १० वाजता रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमजाई माता क्रीडा मंडळ प्रशिक्षण सभागृह येथे आयोजित करण्यात येत आहे.
प्रत्येक दीव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग 2 मुले व 2 मुली यांचा स्पर्धेत सहभाग अपेक्षित आहे.
तरी सगळया शाळांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे व आपल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
जिल्ह्यातील निवड झालेले योगपटु पुणे येथे होणाऱ्या स्पोर्ट्स चॅम्पियशीप२०२२/२३साठी पात्र ठरतील नाव नोंदणी साठी खालील मोबाईल नंबर वर काॅल अथवा व्हाट्सअप करून कळवावे शेवटची तारीख ४ फेब्रुवारी संध्याकाळी ६वाजता राहील.
स्थळ: सोमजाई माता क्रीडा मंडळ प्रशिक्षण सभागृह खरसई स्टॅण्ड जवळ ता. म्हसळा जि.रायगड
रायगड जिल्हा योगासन जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अधिक माहिती साठी खालील व्यक्तिंशी संपर्क साधावा.
श्री. उत्तम मांदारे -8779628851
श्री. जयसिंग बेटकर -9209271872
श्री हरीष पयेर – 9833614262
श्री.दत्ताराम अंबाजी पयेर- 9561627419
काशिनाथ कोकाटे-9359123988
श्री भास्कर म्हात्रे – 7977734199