दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
मागील ३४ वर्षे सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा आणि कला क्षेत्रात अविरत समाजकार्य करीत असलेली गावदेवी क्रिडा मंडळ विलेपार्ले वतीने समाजपयोगी कार्यक्रम करण्यात येतात. भारतीय प्रजास्ताकदिनी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याच औचीत्याने आगरी समाजासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेले समाज सेवक म्हसळा श्रीवर्धन १८ गाव आगरी समाज माजी अध्यक्ष महादेव चांगु पाटील,गाव देवी क्रिडा मंडळ माजी कर्णधार सुभाष पेरवे आणि कै.जगन्नाथ चौलकर यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयोजीत भव्य सोहळ्यात श्रीवर्धन म्हसळा १८ गाव आगरी समाज माजी अध्यक्ष महादेव पाटील खारगावखुर्द सकलप,ता.म्हसळा यांनी गेली ४ दशके आगरी समाजाची अविरत सेवा करीत असलेले तसेच विविध सामाजिक पदांवर कार्य करणारे,मनात सामाजिक जाणिव आणि समाजाबद्दल प्रेम ठेवत सामन्य कुटुंबातील ध्येयवादी व्यक्ती १८ गाव अध्यक्ष,सरपंच,सभापती ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्यांपासून राजकीय क्षेत्रात वर्चस्व करू शकले हे कर्तुत्वाने दाखवून दिले असल्याने.तसेच तालुक्यांचे पंचक्रोशीत पसरलेला आगरी समाज एकत्रित करण्याचे महत कार्य केले आहे.महादेव पाटील यांनी मनात एक स्वप्न साकार करण्याचे ध्येय बाळगत १८ गाव आगरी समाजाची एक स्वतंत्र वास्तू उभी करावी याकामी समाज सेवक,सर्व पक्षीय नेते मंडळींचे सहकार्य घेऊन भव्यदिव्य अशी समाज वास्तू उभारली त्यात माजी अध्यक्ष पाटील यांचे सर्वात मोठे योगदान असल्याने त्यांचे समाज कार्याची दखल घेत गावदेवी क्रीडा मंडळ विलेपार्ले तर्फे आदरपूर्वक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.महादेव पाटिल यांचा सत्कार करताना त्यांना समजाचे वतीने आपण केलेल सामाजिक कार्य हे अतुलनीय आहे आणि आपण करत असलेल्या कार्याचा आलेख निरंतर उंचावत जावो अशा सदिच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे उद्घाटन कबड्डी स्पर्धा प्रशिक्षक गणेश पेंजले,मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला सेना चिटणीस वरुण सरदेसाई,माजी खासदार अनंत गीते, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चालके,बबन पिळनकर,प्रकाश लाड, विठाबाई बिराडी,संगीता नाक्ति,लक्ष्मण बिराडी,सुरज रोटकर, तुकाराम नाचरे,संदेश पाटिल,आरती नाक्ती आदी सर्व पक्षीय मान्यवर मंडळी उपस्थित होते.