दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-स्थानिक अमरावती पाणीपुरवठा योजनेचा सिंभोरा हेडवर्क येथे वीज पारेषण व वितरण कम्पनी तर्फे देखभाल व दुरुस्तीचे काम दि.४ फेब्रुवारी ला करण्यात येणार आहे.त्यामुळे शनिवार रोजी दुपारनंतर होणारा शहरातील भीम टेकडी,माया नगर,बेनोडा ट्रेंच,अर्जुन नगर,राठी नगर,व्ही.एम.व्ही,पॅराडाइज कॉलोनी,रहाटगांव,नवसारी,महादेव खोरी,सर्किट हाऊस जेल रोड,कॅम्प परिसर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मजीप्रा द्वारे करण्यात आले.