दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- “बोल्हाई प्रतिष्ठान च्या मातृस्पर्श माध्यमातून आईच्या समर्पित कार्यातून इतरांना स्फूर्ती मिळेल असे काम करणाऱ्या मातांना शोधून त्यांचा सन्मान करणे हे कार्य निश्चितच समाजासाठी मोलाचे आहे.” असे मत श्यामसुंदर जहागीरदार गुरुजी यांनी गुरुवारी दि. २ फेब्रुवारी येथे आयोजित मातृस्पर्श आई गौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
बोल्हाई प्रतिष्ठान च्या अध्यक्ष नलिनी लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी २फेब्रुवारी रोजी “मातृस्पर्श आई गौरव सोहळ्यात आई चा सन्मान” केला जातो.
गावातील शारदा वाचनालय शिवमंदिर प्रांगणात दुपारी तीन ते सायंकाळी ५ दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी गावातील बालवाडी शिक्षिका सौ. उर्मिला नारायण पांचाळ
या उभयतांना मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बोल्हाई माता व भगवान शंकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माणिक भिसे, देविदास डांगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक प्रतिष्ठान चे सचिव गणेश लोखंडे यांनी केले.
यावेळी सुरेंद्र देशपांडे,प्रतिष्ठान च्या अध्यक्ष नलिनी लोखंडे, प्रा. प्रदिप देशमुख, शशीकला येवतीकर, मिना जोशी,मिरा बोधनकर,मधुरा लोखंडे, सौ. देशपांडे,सुनिता जोशी,सानिका लोखंडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे, सूर्यकांत माली पाटील, लक्ष्मण कांबळे, विठ्ठल ताटे पाटील,लक्ष्मण भिसे, संभाजी काळम, देविदास डांगे, दिपक लोखंडे, रुद्रेश्वर कागदे, शाश्वत लोखंडे, मोहन लामदाडे, कचरू, परिक्षित लोखंडे, आदींची उपस्थिती होती.
———————————