दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे, दि. ७: जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह पुणे येथे ते नागरिकांना दुपारी ४ ते ५ या वेळेत भेटतील.
निवडणूक निरीक्षक म्हणून एस. सत्यनारायण यांची नियुक्ती करण्यात आली असून ते व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०४ येथे नागरिकांना भेटतील. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०२ असा आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अनिल किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून ते व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०१ येथे नागरिकांना भेटतील. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०१ असा आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प नारायण सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून ते व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०२ येथे नागरिकांना भेटतील. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४१६१० असा आहे.
निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.