दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
______________________________________
पार्डी (मक्ता):ता.अर्धापूर येथील राजाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ग्रंथालय शाळेच्या दारी’ हा उपक्रम कै.झेलनराव देशमुख सार्वजनिक वाचनालय,पार्डी (मक्ता) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरदराव देशमुख तर प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक बालाजीराव गडगूळ, विजयराव कांडलकर, मारुती हणमंतकर,अभय देशमुख यांची उपस्थिती होती.या वाचनालयाचे प्रमुख अजय देशमुख यांनी प्रास्ताविकात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.यावेळी बोलताना विजयराव कांडलकर यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी वाचन महत्वाचे असल्याचे सांगितले.मारुती हणमंतकर यांनी विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी वाचन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोपात नियमित वाचन केल्यास समृद्ध जीवन निश्चितपणे होईल.यासाठी विद्यार्थी पुढे येणे गरजेचे आहे असे विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव कांजाळकर यांनी केले तर साईनाथ देबडवार यांनी आभार मानले.यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाचन संस्कृती जपण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रफुल्ल देशमुख, महेश देशमुख,सौ.पल्लवी हरणे,सौ.शिला रामगिरवार, नंदकिशोर मुगटकर, बालाजी बेटकर, अमित देशमुख, हणमंत अनमुलवार यांनी परिश्रम घेतले.