दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..संत सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी गोर बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे शासनाच्या वतीने ५९३ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून अनेक श्री.संत सेवालाल महाराज याचे भक्त उपस्थित राहणार असून, लाखोच्या संख्येने जनसागर उसळणार आहे.यावेळी श्री. संत सेवालाल महाराज व परमपूज्य रामराव बापु महाराज यांचा जय जयकार होणार आहे.गोर बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड,आमदार निलय नाईक,आ.इंद्रनिल नाईक,आमदार राजेश राठोड आमदार तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून गोर बंजारा धर्मपिठाचे गोरधर्म पिठाधीश्वर परमपूज्य बाबुसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार श्री संत सेवालाल महाराज यांच्या पुण्यभूमीचा भव्य विकास आराखडा तयार केलेला असून,शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये पुढील तीन वर्षांमध्ये काम पूर्ण केले जाणार आहेत याचा आनंद आणि उत्साह संपूर्ण बंजारा समाजामध्ये आहे.यासाठी भूमिपूजन आणि श्री. संत सेवालाल महाराज यांच्या पुण्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखोचा जनसागर उसळणार आहे.अशा या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व बंजारा समाज बांधवांनी वाजत गाजत उत्साहाने सहभागी असे आव्हान नेत्रा न्युज-२४ चे उपसंपादक श्री.आत्माराम राठोड यांनी केली आहे.
सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह महाराष्ट्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून ना.मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मागण्याचे निवेदन दिले जाणार आहे.आणि यातून बंजारा समाजाची देशव्यापी असलेल्या संख्याच्या बळावर बंजारा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी बंजारा समाजातील सर्व नेते समाजाच्या हितासाठी सर्वपक्षी विचार बाजूला करून गोरधर्माच्या पांढऱ्या झेंड्याखाली एकत्र येणार आहेत. यामुळे समाजाचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील हा आशावाद गोर बंजारा समाजाच्या गोरधर्माच्या पांढऱ्या झेंडा खाली सर्व समाज एकवटत असल्याचा आनंद राठोड यांनी बोलून दाखविला.
गोर बंजारा धर्मामुळेच बंजारा समाज एकी आणि शक्ती टिकवून राहील व बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.