दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनीधी -जगन्नाथ साठे
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशन आणि पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून कामे न करता चार कोटी रुपयांची बिले काढण्यात आली आहे अशा प्रकारच्या बातम्या मागील सात ते आठ दिवसापासून दैनिक वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे व भडकपणे प्रसिद्ध होत आहेत. या बातम्या जाणीवपूर्वक छापून येत आहेत.स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडून पारदर्शकपणे राबविल्या आहेत. तरी ही काही विघ्संतोषी लोकांनी केवळ आमची बदनामी करण्याच्या हेतूने व सत्य लोकांसमोर यावे यासाठी सदरचे निवेदन देत असून तालुक्यांतील कोणत्याच गावात असा घोटाळा झाला नसल्याचे सांगोला पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना कमले म्हणाले की, सांगोला तालुक्यात जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एकूण 69 कामे मंजूर असून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिये द्वारे विविध ठेकेदारांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.यापैकी सध्या जवळपास 40 कामे प्रगतीपथावर आहेत. वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करून नमूद केलेली लक्ष्मीनगर,कटफळ ,वाटंबरे,वाणीचिंचाळे, मांजरी, धायटी व एकतपुर या गावांच्या योजनेचा मक्ता मे ज्योतिबाराजे कन्स्ट्रक्शन व अर्थमूव्हर्स चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना मिळालेला आहे तर अचकदाणी योजनेचे काम आर.के.कन्स्ट्रक्शन मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांची नावे मंजूर आहे. अचकदाणीचे कामाचे पाईप प्रत्यक्षात जागेवर जमा करून ठेवण्यात आले असेल पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर आहे.
उपरोक्त नमूद केलेल्या मे ज्योतिबा राजे कन्स्ट्रक्शन यांना मिळालेल्या सर्व कामांची संख्या व किंमत जास्त असल्याने काम करताना सोयीस्कर व्हावे व पाईप सुरक्षित रहावे याकरिता खरेदी केलेले सर्व पाईप त्यांच्या चिंचोली येथील मध्यवर्ती गोडाऊन मध्ये सिसीटीव्हीच्या निगराणीखाली जमा करून ठेवलेले आहेत. याबाबत त्यांनी कार्यालयास तशी विनंती केली होती, त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी मध्यवर्ती एकाच ठिकाणी सर्व योजनांची पाईप जमा करून ठेवणेस संमती दिलेली आहे.
वरील नमूद पाईप शासनमान्य कंपनीचे असून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आलेली आहे. सर्व पाईप जागेवर गोडाऊन मध्ये असून सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षित आहे, याची खातर जमा मी स्वतः केलेली असून कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा समक्ष भेट देऊन याची तपासणी करून खात्री केलेली आहे. योजनेसाठी लागणारी सर्व पाईप खरेदी केली असल्याचे ठेकेदाराने संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांना व ग्रामसेवक यांना माहिती दिलेली आहे. ती सर्व कामे लवकर लवकरच प्रत्यक्षात जागेवर सुरू करण्यात येणार आहेत.
एका राजकीय पक्षाच्या काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे धादांत खोटे असून त्यामध्ये काहीही सत्य नाही. मक्तेदारासोबत असलेल्या वैयक्तिक द्वेशासाठी त्यांनीआरोप केले आहेत. जाणीवपूर्वक मुद्दाम हून शासकीय अधिकारी यांची बदनामी करण्याचा व त्यांना वेठीस धरण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप ही सबंधित ठेकेदाराने बोलून दाखविला आहे. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार अगर भ्रष्टाचार झालेला नसून सर्व खरेदी केलेले पाईप्स हे जागेवर सुरक्षित आहेत. तालुक्यामध्ये सध्या सुरू असलेली जलजीवन मशीनची सर्वच कामे गुणवत्तापूर्वक करून घेतली जात असून यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही. या कामी कुठल्या ही चौकशीस समोर जाण्याची तयारी असल्याचे उपअभियंता सुरेश कमले यांनी सांगितले.