दैनिक चालु वार्ता आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: अवधूत शेंद्रे
सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरे होतात त्यात वाढदिवसा निमित्य बालकांचे हाती केक कापण्यासाठी शस्त्र देणे,मेनबत्ती विझवून बालकासमोर अंधार करणे,फुगे फोडणे असले प्रकार म्हणजे परकीय रुढिचे अंधानुकरण होय यासाठी सामु.प्रार्थनेचा ऊपक्रम करावा असे विचार मुख्याद्यापक सुनिल ठाकरे यांनी वर्धपूर येथे व्यक्त केले वर्धपूर (वडाळा) येथे स्वातंत्र्यवीर लोहे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अनोखा वाढदिवस करुन आदर्श घडविला.निमित्य होते शिक्षक रामेश्वर कांदे यांच्या वाढदिवसाचे.आजकालचे नोकरशहा व गुरुजीही आपला वाढदिवस हाॅटेल किंवा ढाब्यावर साजरा करतात.पण कांदे गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांसोबतच वाढदिवस साजरा करणे पसंत केले. विद्यार्थ्यांनी गुरुजीसाठी वर्गणी केली .मुख्याद्यापकांनीही पैसे दिले व नास्ता ,खाऊची व्यवस्था केली .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सर्व धर्म सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली .अशा प्रकारे परकिय रुढीला तिलांजली देवून राष्ट्रसंताचे विचार अंमलात आणून आदर्श वाढदिवस साजरा केला व ईतरांसमोर आदर्श घडविला.याबद्दल गावकरी शाळेचे कौतुक करीत आहे. यासाठी गुरुदेव सेवामंडळाचे सर्व सेवक,सह. शिक्षक संजय घोरपडे, महादेव बाळोकर यांनी सहकार्य केले.