दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
स्थानिक तुळशीनगर विकास समितीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून तुळशीनगरच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. तुळशीनगरातील नागरिकांना उच्चतम सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या भागात सुंदर उद्यान निर्मिती करण्यात येईल, ज्यामुळे नागरिकांना योगसाधना केंद्र, व्यायाम केंद्र , जॉगिंग ट्रॅक आणि विरंगुळा केंद्र उपलब्ध होईल अशी घोषणा नामदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
*लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर विकासाची मोठी जबाबदारी आहे. अशातच चंद्रपूर सुंदर व अप्रतिम व्हावे यासाठी प्रयत्न मी करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर शहराचा प्रत्येकाला हेवा वाटेल असे शहर बनवायचे असल्याचे यावेळी जिल्हा पालकमंत्री नामदार मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातुन उपस्थितांना सांगितले*
या कार्यक्रमाचे वेळी आमदार किशोर जोरगेवार, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अविनाश राखोंडे, तुळशीनगर विकास समितीचे अध्यक्ष के. एन. देवतळे, उपाध्यक्ष दौलत रामटेके, सचिव अनिल देवतळे, कार्याध्यक्ष अनिल माथनकर,सौ. मंजुश्री कासनगोट्टुवार, पुरुषोत्तम सहारे, वासुदेव भोई, मालाताई रामटेके उपस्थित होते.