दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मौजे दिग्रस ( बु ) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावंतस बहुजन प्रतिपालक स्वराज्य संस्थापक श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य दिव्य स्मारकाचे सर्वेसर्वा मारोती भगवानराव पाटील गवळे यांच्या माध्यमातून दिग्रस नगरीमध्ये 10 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजन्मोत्सवाची आढावा बैठक घेण्याचे आयोजन संपूर्ण गावकऱ्यांसाठी दवंडी देऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते. . त्या अनुषंगाने कंधार तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले , लोकसंख्येच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने प्रगतशील असलेले दिग्रस बु…. या गावी विठ्ठलेश्वर मंदिरात संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत 2023 च्या जयंती सोहळ्याच्या अर्थातच शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे कट्टर पुरस्कर्ते नंदूसिंह माधव सिंह ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी गावातील राजकारणाचे विरोधी पक्षनेते मनोहर गणपती भुरे आणि सचिवपदी संग्राम नागरगोजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. . याप्रसंगी गावातील राजकीय , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे दिग्गज मान्यवर या बैठकीस उपस्थित होते तसेच शिवजन्मोत्सव समिती नवनिर्वाचित पदाधिकारी रघुवीर वडजे , गोविंद सोनटक्के , साईनाथ शिंदे , किरण वडजे, हानमंत वडजे , श्रीराम वडजे , सुजित गोरे , बाळू वडजे , कैलास शिंदे , मल्लिनाथ शिंदे व गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण तडफदार सर्वच जाती धर्मातील नवयुवक आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवनिर्वाचित समितीचे गावक-याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. .या शिव जन्मोत्सव सोहळ्याचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे कंधार मुखेडचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचे खंदे समर्थक दिग्रस नगरीचे तरुण तडफदार युवा नेतृत्व मारोती भगवानराव पाटील गवळे करीत आहेत.