दैनिक चालु वार्ता जिल्हा उपसंपादक, परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
************************* परभणी : लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करुन त्यांना विकणारी आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात परभणी पोलिसांनी पाळत ठेवून शिताफीने ताब्यात घेतली. सदर टोळीकडून प्राप्त माहितीच्या आधारेच पोलीस दलाने या प्रकरणात आणखीन चार आरोपींना जेरबंद केले असून त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, या चौघांकडून आणखी दोन बालकांना शोध मोहीमेद्वारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या मुलांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे.
या प्रकरणात ज्या दहा आरोपींना जेरबंद करण्यात आले होते, त्यापैकी आठ परभणीतील तर उर्वरित आंध्रा व तेलंगणातील होते. या प्रकरणी शोध मोहीम जोमाने सुरु ठेवली होती. तपासाला अधिक प्रमाणात गती दिल्यामुळेच आणखी रुद्रेश हरिश्चंद्र वारंग (रा. ठाणे), सुमन पुडी लक्ष्मी दुर्गा (रा. कोकाडपल्ली हैद्राबाद), सिलमप्रभा अनिल (रा. भद्रादी कोथागुडेम) इटी त्रिनाथ व्यंकटराव (रा. विजयवाडा) या चौघांना अथक प्रयत्नातून ताब्यात घेणे शक्य झाले आहे. या प्रकरणी तपासकार्य अजूनही शीघ्र गतीने सुरू ठेवण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणाची पूर्व माहिती अशी की, मौहम्मद युसूफ मोहम्मद हैदर (रा. अजमेर कॉलनी) यांनी त्यांचे ४ वर्ष ३ महिने वय असलेल्या मुलाचे अपहरण अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने केले असावे, अशी तक्रार ६ फेबु्रवारी २०२२ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. त्या आधारे दाखल गुन्ह्या पाठोपाठ सोफिया बेगम अर्शद खान या राजस्थानमधील एका महिलेने सुध्दा त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केले असावे, अशी तक्रार १ मार्च २०२२ रोजी दिली होती. सदरचे दोन्ही गुन्हे अनैतिक मानवी तस्करी विभागाकडे वर्ग करण्यात आले. ज्यामुळे पोलीस उपनिरिक्षक आर.जी. भावसार, पोलीस अंमलदार शेख शकील अहेमद, किरडे, शिरसकर व शेळके यांनी या प्रकरणाचा शोध तातडीने सुरु केला. अपर्हत बालकांच्या बाबतची माहिती संकलन करून सतत एक महिना गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली होती. तपासामध्ये दोन्ही गुन्ह्यातील बालकांचे अपहरण अजमेरी कॉलनीत राहणारी महिला सुलताना उर्फ परवनी बी शेख सादेक अन्सारी हिनेच केल्याचे तपसातून निष्पन्न झाले. तिला मदत करणारी तिची बहिण नूरजहाँ बेगम मोहम्म इब्राहिम शाकेर व तिचा विधीसंघर्ष बालक यास शिताफीने ताब्यात घेवून पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीतून जी माहिती प्राप्त झाली ती पुढीलप्रमाणे…
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पालमचे पो. नि. प्रदीप काकडे, सिबर्चे पो. नि. संजय करनुर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, श्रीमती कल्पना राठोड, जी. टी. बाचेवाड, पोउपनि. श्रीमती राधिका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसमे, नागनाथ तुकडे, शकील अहेमद, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, स्वप्नील पोतदार तसेच पो. मु. क्यु. आर. टी, कोतवाली, पालम, नवा मोंढा, एएचटी युनिटचे अंमलदार, स्था.गु.शा. चे अंमलदार, सायबर पो.स्टे. चे सर्व अंमलदार यांनी या मोहिमेत बजावलेली कामगिरी मौलिक अशीच म्हणावी लागेल.