दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा):तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठक आष्टी पं.स.सभागृहात भाजपाचे आ.दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यात प्रामुख्याने बांबर्डा, बोरखेडी,चामला,थार,किन्ही, पंचाळा,पोरगव्हाण,पांढुर्णा गावाचा पाणी टंचाईचा मुद्दा अधिक गाजला यावेळी ग्रा.प.थार येथील मुद्द्यावर सत्ताधारी, विरोधक आमने सामने आले होते तर वडाळ्याचे उपसरपंच बबनराव कोहळे यांनी आक्रमकपणे बाजू मांडली यात गट ग्रा.पं.थार आणि चामला मध्ये विहीर रुंदीकरण खोलीकरण,आबाद किन्ही विहीर खोलीकरण व सार्वजनिक विहिरीचे काम करणे गट ग्रा.पं.बांबर्डा विहीर खोलीकरण गाढ काढणे व वाढीव पाईप लाईन तर बोरखेडी मध्ये सार्वजनिक विहिरीचे बांधकाम गट ग्रा.पं.पोरगव्हान मधील पांढुर्णा येथे पाईप लाईन पंचाळा या गावात विहीर नूतनीकरण बंधारा दुरुस्ती व विहीर खोलीकरण व झाडगाव येथे पाईप लाईनची मागणी सरपंच रविना दुधकवरे यांनी केली तर मोई, मुबारकपूर येथे विहिरीचा गाळ काढणे आदी पाणी टंचाई संदर्भात मागण्या आहेत तर खडका आणि जोलवाडी
येथे जल शुद्धीकरण यंत्र (आर.ओ.प्लांट) ची मागणी आहे तर धाडी येथील सरपंच दिलीप भाकरे यांनी सध्याच्या विहिराला आडवे,उभे बोअर करणे आणि विहीर अधिग्रहण करणे अशी मागणी केली वर्धपुर या गावी बुध्द विहारा जवळ हातपंप करणे ग्रा.पं.साहूर सरपंच भावनाताई खरडे यांनी सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण करून आडवा
बोअर आणि हातपंपाची मागणी केली तर सावंगा(पुनर्वसन)मध्ये विहिरीचे खोलीकरण उभा
बोअरकरणे सरपंच संगीताताई लवनकर यांनी केली ग्रा. पं. टेकोडा येथे नवीन विहीर,जुन्या विहिरीला बोअर आणि हातपंपाची मागणी सरपंच जयाताई कठाने यांनी केली ग्रा.पं. तळेगाव (शां.पंत) जल जीवन मिशन अंतर्गत भूमिपूजन घेणे अशी मागणी आहे ज्यां गावांना पाणी टंचाईची झळ नाही असे गावे नवीन आष्टी, दलपतपुर अजितपुर, काकडदरा जुना, नवीन, इंदरमारी,गोदावरी, नबापुर, रानवाडी, हरिषवाडा, अंबिकापुर,देलवाडी, नरसापुर वाघोली, सत्तरपुर, तारासावंगा वाडेगाव,पेठ,बेलोरा(बु) या गावांसमोर निरंक लिहिलेले आहेत चिस्तूर: बोअर करणे,हातपंप आनंदवाडी: गाळ काढणे विहीर दुरुस्ती करणे, किन्हाळा: विहीर अधिग्रहण ममदापूर: हातपंप करणे
भिष्णूर : नवीन विहिरीचे पाणी तपासने, अंतोरा जुना : सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसणे माणिकनगर: सार्वजनिक विहीर खोलीकरण गावातील पाईपलाईन बदलणे खंबित: पंप बदलविणे खडकी: सार्वजनिक विहीर दुरुस्ती बेलोरा (खुर्द) विहीर अधिग्रहण करणे लिंगापुर: विहीर खोलीकरण व विहिरीचे वरील बांधकाम करणे जैतापूर: विहीर अधिग्रहण करणे परसोडा: विहीर अधिग्रहण शेरपुर: नळ योजना पिलापुर : जाडी बसवणे व पाण्याच्या टाकीजवळ जाण्यासाठी रस्ता येणाडा: विहीर पाण्यात आहे शिरसोली: विहिरीपासून टाकीपर्यंत पाईपलाईन व साडेसात हॉर्स पावरची मोटर वाघोली: विहीर दुरुस्त करणे बोरगाव (टू): सार्वजनिक विहिरीचा गाळ व जलजीवन योजना राबवणे दृगवाडा: नवीन विहिरीतील गाळ काढणे व पाईपलाईन सालोरा: सिमेंट पाईप लाईन काढून नवीन पाईप लाईन टाकणे या मागण्या ग्रा.पं.च्या अधिकृत निमंत्रित प्रतिनिधींनी मांडल्या पण यात काही अनिमंत्रित्त अनधिकृत प्रतिनिधींनी खाजगीत आमदार केचे समोर बाजू न मांडता सभागृहातच बाजू मांडल्या त्यामुळे उपस्थितीतामधील नियम मानणाऱ्यामध्ये काही वेळ मनोरंजनाचा विषय निर्माण झाला होता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आ. दादाराव केचे यांनी उपस्थितीतांचे आभार मानून तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या प्राधान्य क्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण नायब तहसिलदार दीपक काळुसे भाजपा
तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर,भाजपा पदाधिकारी निलेश देशमुख, पत्रकाराचे फोन न घेणारे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपविभागीय अभियंता विलास काळपांडे [कारंजा(घा)] लघु सिंचन उपविभागीय अभियंता(आर्वी) विपिन साबळे, भूजल सर्वेक्षण उपविभागीय अभियंता (जि.प.) व्हटकर मंचावर होते सभागृहात विविध गावचे सरपंच,उपसरपंच पं.स.क्षेत्रातील ग्रामसेवक तर पं.सं. कार्यालयातील वरिष्ठ सहा अनिल नागपुरे, कनिष्ठ बांधकाम अभियंता शुभम अडसड,पाणी पुरवठा अभियंता मंगेश किंनाके स्था.अभि.यांत्रिकी सहा.गौरव चौधरी डाटा ऑपरेटर हरीश शेटे,नावेद खान आदी उपस्थित होते