दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव ते परतवाडा मार्गावर पांढरी नजिक दुचाकी क्र.एमपी ४८ एमएन ५७२८ ला आज्ञत वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वरिल अनुराग कोरे वय ३० व उमेश उइके वय ३० दोघेही (पोकरना ता.भैसदही) मध्यप्रदेश मधील रहिवासी असून दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.सदर घटना दि.१३ मार्च सोमवार रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान घडली असून जखमींना ग्रामीण रूग्णालय अंजनगाव सुर्जी येथे दाखल केल्यानंतर दोघेही गंभीर जखमी असल्याने जिल्हा रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले.दोन्ही जखमी हे पांढरी येथील जिनिंग फॅक्टरी येथे मजूरी करत असून ते पांढरी वरून काही कामानिमित्त पथ्रोट येथे जात असल्याचे समजले.पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत.