दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
आज कौठा ता.कंधार येथे कै.लक्ष्मणराव पालीमकर प्रतिष्ठाणचे मॉडेल पब्लीक स्कूल आयोजीत वार्षिक स्नेह संम्मेलन आयोजीत करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवकुमार देशमुख प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ.लक्ष्मीबाई संजय देशमुख सरपंच सौ.अर्चना शिवकुमार देशमुख डॉ. स्वप्नजा चांडोळकर अँड विजय धोंडगे शंकरराव देशमुख संभाजीराव देशमुख विश्वनाथ देशमुख आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे संचालक प्रा.डॉ.दिलीप पालीमकर सर आरुण महाराज शिवकुमार मठपती गुणवंत पालीमकर सह इंग्लीश स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षीका इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात बाल कलाकार यांनी श्री गणेश वंदना करून केली नंतर शाळेच्या सर्वच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपला सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा.डॉ.दिलीप पालीमकर सर यांनी केले तर सुत्रसंचलन बरगले सर यांनी केले कार्यक्रम पहाण्यासाठी पालक व गावातील महिला पुरुष यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.