दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा,विक्रमगड आणि डहाणू या तालुक्यात चालणाऱ्या शिक्षण रंजन केंद्रातील अपंग आणि कर्णबधिर मुलांना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व एच.डी.एफ.सी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमानने अपंग विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्यांचे वाटप करून या अपंग विद्यार्थ्यांचे जीवनमान कसे सुलभ करता येईल या हेतूने व्हील चेअरचे वाटप करण्यात आले.श्री जयेश्र्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एच.डी.एफ.सी बँक परिवर्तनचे सी.आर प्रमुख योगेश पगारे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संचालिका स्वाती सोनवणे यांच्या उपस्थितीत कर्णबधिर मुलांना कानाचे मशिनचे वितरण करून लोकार्पण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती.केंद्रातील उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत करून पथनाट्य व पटेट शोचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित लावली.शैक्षणिक साहत्य भेट देऊन शिक्षण रंजन केंद्रातील ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेला साहित्य सुपूर्त करण्यात आले.या कार्यक्रमाला डेंगाचीमेट ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुळशीराम बोरसे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चंद्रकला कडू,सर्वशिक्षा अभियानाचे गजानन एगडे व पुजारी,शाळेचे शिक्षक विलास भोये तसेच इतर सहशिक्षक,पालकवर्ग यांनी उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पच्या व्यवस्थापिका सरस्वती विरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे शिक्षण मित्र प्रमोद शेंडे यांनी केले.