
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. यानंतर मनसेने आणखी काही अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी इशारा दिला आहे. यावर आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. ते येवल्यात बोलत होते.
देशात दुसरे प्रश्न नाहीत : बच्चू कडू पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर बच्चू कडू यांनी टीका केली आहे. इकडे मस्जिद काढा, तिकडे मंदिर बांधा, येथील भोंगे उतरवा हे काही देशाचे प्रश्न नाहीत. शेतकऱ्यांचे आणि इतरही अनेक प्रश्न असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. मालेगाव येथे होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवर त्यांनी टीका केली.