दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर – प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटामध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांना संधी देण्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी हायटेक कॉलेज बजाजनगर येथे केली. घर,बंदूक,बिर्याणी चित्रपटाच्या प्रमोशन साठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील आले होते. युवक, युवतींच्या जल्लोषात कलाकारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला यावेळी तरुणाईने एकच जल्लोष केला.7 फेब्रुवारीला रिलीज होणारा घर, बंदूक, बिर्याणी, चित्रपट सगळ्यांनी बघावा असे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे व कलाकारांनी यावेळी केले