दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा..
लग्नातील वरात, गणेशोत्सव, शिवजयंतीच्या मिरवणुका, धार्मिक सोहळे किंवा महापुरुषांच्या जयंती असो. मधुर सुरावटी आणि झंकारणाऱ्या तालांच्या साथीने प्रत्येक मंगलकार्याची शोमा द्विगुणित करणाऱ्या बँड पथकांचा आवाजच बसला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र वरातीत नाचणाऱ्या युवकांकडून प्रामुख्याने डीजेच्या तालावर थिरकण्याची धूम केली जातआहे. बदलत्या काळात बँड पथकाला मात्र कोणीही विचारत नसल्याची स्थिती निर्माण झाली असून, बँड वाजविणारे हजारपेक्षा अधिक जण बेरोजगार
झाले आहे. लग्नसमारंभात
निवडणुकीच्या जंगी मिरवणुकीत,छोट्या-मोठ्या घरगुती समारंभापासून
प्रत्येक ठिकाणी वाजवणाऱ्या
कलाकारांची आवश्यकता असते.
लग्नसमारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींचा जोश वाढवण्याचे काम हे कलाकार करतात. वर्षातील काही दिवसच यांना रोजगार उपलब्ध असतो. या काही
दिवसांच्या रोजगारावरच
कलाकारांना आपले कुटुंब वर्षभरचालवावे लागते. गेल्या काही वर्षांपासून मात्र कर्कश आवाजाने बँडचा आवाज बसला आहे. चौकट
🎆 (बँड पथकांना मागणी नाही?)
अलीकडच्या काही वर्षांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह लग्नकार्य व इतर सर्वच प्रकारच्या सोहळ्यांमध्ये तरुणाईमधून बँड किवा ढोलताशा न वापरता डीजे लावण्यावर विशेष भर दिला जात आहे. काळाच्या ओघात बँड पथक हरवल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. त्या तुलनेत ढोलताशे आणि त्यातही डीजेला नागरिकांमधून विशेष मागणी आहे. बँड पथकातील तरबेज कलावंत यामुळे बेरोजगार झाले आहेत. यामुळे या क्षेत्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.