दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष तथा तेलंगवाडी चे माजी सरपंच सुरेश मामा बास्टे व संजय पाटील मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत.
सतत ५० वर्षे सत्तेत राहाणारे पराभूत
………………………………………..
येथून जवळच असलेल्या मौजे
जोशीसांगवी ता.लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीचे दोन एप्रिल २०२३ रोजी निवडणूक झालेल्या अतितटीच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात सोसायटी आली असून विद्यमान भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष तथा तेलंगवाडी चे माजी सरपंच सुरेश मामा बास्टे यांच्या गटाला तेरा पैकी तेरा जागेवर यश मिळाले आहे.
लोहा तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी जोशी सांगवी ता.लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय अतितटीच्या व चुरशीमध्ये झाली . यामध्ये ५० वर्षापासून सोसायटीवर वर्चस्व असलेले सत्ताधारी गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी एकता शेतकरी विकास पॅनल चा दारुण पराभव करण्यात नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुरस्कृत पॅनलला यश मिळाले आहे. दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी जोशीसांगवी ता.लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली .या निवडणुकीमध्ये जोशी सांगवी ,तेलंगवाडी, शिराढोण तांडा या गावचे मतदार होते. या निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल एक गट व दुसरा गट एकता शेतकरी विकास पॅनल आमदार श्यामसुंदर शिंदे पुरस्कृत हे दोन गट निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी मैदानात आमने-सामने उतरले होते. मागील सोसायटीच्या निवडणुका अत्यंत खेळीमेच्या वातावरणात पार पडल्या. पण यावेळेस विरोधी गटाने एकास एक उमेदवार देऊन निवडणुकीत रंग भरला .या अटीतटीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत पन्नास वर्षां सेवा सहकारी सोसायटीवर अधिराज्य गाजविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड आसमान दाखविले आहे. सायंकाळी उशिरा मतमोजणी दरम्यान श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनलला तेरा पैकी १३ पैकी १३ जागा मिळाल्या. तर विरोधकांना एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. मतदान पार पडल्यानंतर निकाल उशिरा जाहीर झाला. त्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिशबाजी व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला. यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारापेकी सर्वसाधारण उमेदवार जगदाळे हनुमंत धर्माजी – १०७ मते,पोकले मारोती गंगाराम – 102 मते ,मोरे नवनाथ भाऊराव – १०८ मते, मोरे नागोराव व्यंकटराव- १०७ मते, मोरे नामदेव बालाजी – ११४ मते , मोरे संजय भिमराव – ११६ मते , राठोड शिवाजी आमरू – १११ मते,शिंदे शिवाजी खंडू – ११६ मते,चव्हाण अंकुश त्रिभुवन – ११५ ( भ.वि.जा./ ज.वि.मा.प्र ) , तांबोळी रामदास सयाजी ( अनुसूचित जाती / जमाती – १२० मते ,ईबितवार अमृता वामण ( इतर मागासवर्गीय ) – ११५मते , गजभारे कमल देविदास ( महिला राखीव ) – ११२ मते, सुकरे अनुसया रामचंद्र ( महिला राखीव ) – १०७ मते
ह्या निवडून आलेल्या उमेदवारा पैकी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होईल ही उत्सुक्ता मतदारांना लागली आहे .या उमेदवाराचे व पॅनल प्रमुख यांचे जोशी सांगवी येथील गावातील प्रमुख रस्त्याने फटाके वाजवून ढोलताशाच्या गजरात विजय मिरवणूक काढण्यात आली .यावेळी लोहा भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे,शंकरराव ढगे माजी सभापती,नरेंद्र गायकवाड – माजी उपसभपती,साहेबराव काळे धावरी येथील सरपंच, भद्रीनाथ राजूरे दापशेड येथील सरपंच, मोरे, टेळकी येथील सरपंच, काळे , वडगाव येथील सरपंच, लामदेवडे टाकळगाव येथील सरपंच,रंगराव पाटील लोंढे लोंढेसागवी,साईनाथ पाटील टर्के किवळा येथील सरपंच
व मतदार व गावकरी मंडळी विजय मिरवणूकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोशीसांगवी,तेलंगवाडी,शिराढोण तांडा,येथील मतदारांनी अमूल्य मत देवून विजयी केले व १३ पैकी १३ उमेदवार निवडून दिल्याबद्दल पॅनल प्रमुख सुरेश मामा बास्टे व संजय पाटील मोरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.