दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर /अहमदपूर:- जय संघर्ष संघटनेचे चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांना मानव सेवा संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे व पुरस्कार चे वितरण महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दि 11 एप्रिल 2023 रोजी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे होणार आहे तरी मानव सेवा संस्थेतर्फे जय संघर्ष संघटनेला पुरस्कार मिळणार असे पत्र मानव सेवा संस्थेतर्फे मिळाले आहे व मानव सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री युवराज उर्फ (विक्की) खोकरे व सचिव आर,एस,पाटील, यांनी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना चे विना मुल्य सेवा व प्रवासातील प्रवासी व ड्रायव्हर बांधवांना अपघात वेळी मदत हिच मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे काम पाहून संजय हाळनोर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी सर्व जय संघर्ष ग्रुप चे सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रविण वाघ यांनी केले आहे.