
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक ६ एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंती निमित्त तेलंगाना व महाराष्ट्र च्या बॉर्डरवर असलेल्या मिर्झापूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त आलेल्या लाखो भक्तांना पाणी बॉटल व फळाचे वाटप करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र व तेलंगाना राज्यातील हजारो भक्तांनी मिर्झापूर येथील हनुमानाचे दर्शन घेतले या भक्तांना पाणी व फळाचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर चे तालुका अध्यक्ष मनमत परबते यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते