दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.7 पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पालांडे यांनी शिवसेना उद्योग ठाकरे गटाची साथ सोडत मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, विविध गावचे सरपंच, शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.
पलांडे यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड, समाधान डोके, गोरक्ष काळे, माऊली साकोरे, उपतालुका प्रमुख बापूसाहेब मासळकर, तालुका सरचिटणीस वैभव पलांडे, हेमंत निलख, दादा वाजे, नामदेव पानसरे, पाबळचे सरपंच मारुती शेळके, सादल गावच्या सरपंच छबुताई केसवड आदींनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, या प्रवेशामुळे शिरूर- आंबेगाव- खेड तालुक्यात भाजपला बळ मिळाले आहे. पुढील काही दिवसांत पक्षप्रवेशाचा बॉम्ब फुटणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.