दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
बोथी येथे श्री राम नवमी निमित्त रामकथा व अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहत संपन्न झाला .गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिरासमोर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दादा हाक्के यांची उपस्थिती होती. रामकथाकार हभप सखाराम महाराज पालमकर यांचा शाल पुष्पहार घालुन सुरेश दादा हाक्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या वेळी राम कथा व अखंड हरीनाम सप्ताह च्या निमित्ताने गावातील जेष्ठ नागरिकांसाठी बेंच (बाकडे) बसविण्यात आले.या बाकड्याना लागणारी आर्थिक मदत सामाजिक बांधिलकी मनुन श्री रामदास घुगे ( रेल्वे पोलीस ), श्री नामदेव घुगे(आर्मी), श्री विश्वनाथ आप्पा आवाळे व नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष तथा आदर्श पत्रकार)यांच्या खर्चातून बसविण्यात आले.या कार्यामुळे सर्वांचे कौतुक होतआहे.या वेळी उपस्थित
विश्वनाथआप्पा आवाळे,सुभाष हाक्के (पाटील),देवेश्वर कोईलवाड,श्री ज्ञानोबा घुगे, रमाकांत महाराज केंन्द्रे व समस्त गावकरी व भजनी मंडळ उपस्थित होते .