
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- सोरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक 5 एप्रिल रोजी संपन्न झाली.या निवडणुकीत चेअरमन पदी यशवंत शामराव इंगळे व व्हाईस चेअरमन पदी किशन बाबुराव बयास यांची अविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी आर.बी कातळे, अध्यक्षतेखाली निवडणूक संपन्न झाली.सोसायटीचे सचिव उमाकांत स्वामी यांचीही उपस्थिती होती.विविध सेवा सहकारी सोसायटीमध्ये एकूण 13 सदस्य आहेत पैकी 12 सदस्या मध्ये निवडणूक घेण्यात आली होती.यशवंत इंगळे यांनी जय किसान परिवर्तन पॅनल तयार करून शिट्टी या चिन्हावर आठ सदस्य निवडून आणली आणि दि. पाच एप्रिल रोजी चेअरमन पदाच्या निवडणुकीच्या वेळी विरोधी पॅनलच्या दोन सदस्यांनी निवडीच्या वेळी खंबीर पाठिंबा दिला त्यामुळे पार्टीचा विरोधी उमेदवार कोणीही नसल्याने यशवंत इंगळे यांची अविरोध चेअरमन पदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले.सोरा सोसायटीच्या सदस्य पदी पांडव बयास, सिद्धार्थ मेकले,दतराव सूर्यवंशी,बाबुराव शिंदे, भारत कांबळे, कलावती माने, लक्ष्मीबाई अमरशेटे, बळीराम बयास आदीं सदस्य उपस्थित होते.या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आ.बाबासाहेब पाटील माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,किसान मोर्चा चे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख जि प सदस्य माधव जाधव,माजी जि.प.सदस्य अशोक केंद्रे,सरपंच संतोष होळकर भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते,प्रा.मारोती बुद्रुक पाटील, बालासाहेब होळकर, संजय शिंदे,हरीओम होळकर,अशोक माने राजू इंगळे,वसंतराव शिंदे, वैजनाथ थगनर, विष्णू होळकर,रामदेव जोशी,दिगंबर आगलावे, माधव इंगळे, संजय होळकर,किशन कदम, व्यंकट चंदाले,सुग्रीव चंदाले,मधुकर मेकले, हनुमंत इंगळे,अनंत आगलावे,ज्ञानोबा इंगळे सह सोरा चिलखा येथील ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी अनेक सामाजिक,राजकीय, क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.