
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे
मंठा तालूक्यातील माळेगाव येथे प. पू. राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या तीन दिवशीय गीता रामायण सत्संगा चे आयोजन युवानेते इंजि.माधव चव्हाण व माळेगाव ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले जागतीक बंजारा दिवस व हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर दि.6एप्रिल पासुन सुरुवात करण्यात आले आहे 8एप्रिल रोजी सत्संगाचा समारोप आहे त्या निमित्ताने
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील मंठा ता लुक्यातील माळेगाव येथे येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.दि. ८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजता हेलिपॅड माळेगांव ता. मंठा, जि. जालना येथे आगमन व श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगावकडे प्रयाण, दुपारी १२.१५ वाजता श्री हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगांव येथे आगमन व विश्व बंजारा दिवस व हनुमानजयंतीनिमित्त आयोजित श्री. गीता रामायण सत्संग ज्ञानयज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १.१५ वाजता श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगाव येथून हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी १.२५ वाजता हेलिपॅड माळेगांव येथे आगमन व हेलिकॉप्टरने मोताळा जि. बुलढाणाकडे प्रयाण करतील.