
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद सुरु असतानाच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदवीच्या वादावर भाष्य केलं आहे. ते नवी मुंबईतील खारघर येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. कारण अर्थव्यवस्था ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले आहे. 370 हटवलं आहे. त्यामुळे माणूस डिग्रीने नाही तर कर्माने मोठा होतो, असं मत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले होते.