दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर जिल्हा समता संघर्ष फाउंडेशन च्या वतीने परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त तुकूम मेजर गेट गैलेक्सी सुपर मार्केट जवळ 150 शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक और कंपॉक्स या शालेय साहित्याचे वाटप समता संघर्ष फाउंडेशन च्या माध्यमातून केल्या गेले. हा अपुर्व विधायक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता संघर्ष फाउंडेशनचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनिलदादा पाटील, उपाध्यक्ष कुमारभाऊ जुनमलवार, कार्याध्यक्ष अजय दुर्गे, महासचिव सौरभ धोंगडे ,कोषाध्यक्ष बाळु डांगे ,सचिव नितिन गावंडे, शहराध्यक्ष हाजी सैय्यदभाई, शहर उपाधक्ष सुनिल चौहान,महासचिव ब्रीजेश तांमगड़े,कार्याध्यक्ष सय्यद मोबिन यांचेसह इतर सर्वांनी या कार्यक्रमात महत्वाचे सहकार्य केले.