दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव.
नांदेड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तुलनेत शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड या मराठी माध्यमाच्या शाळेत सेमी इंग्रजीचे प्रवेश दिले जातात व तासिका अतिशय उत्कृष्टपणे चालतात. या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमा प्रमाणेच विविध उपक्रम विद्यार्थ्याकडून राबवून घेतले जातात व विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले जाते. .त्या अनुषंगाने या शाळेतील प्रत्येक शिक्षक , शिक्षिका विद्यार्थ्यांप्रती अतिशय तळमळीने आपले कर्तव्य बजावत असताना दिसून येतात त्यापैकीच इयत्ता वर्ग पहीली सेमी तुकडी ( ड ) या वर्गाच्या वर्गशिक्षिका सौ. स्वामी विद्या मॅडम या अगदी काही कालावधीमध्येच सेवानिवृत्त होणार आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याविषयी पालकांचे व विद्यार्थ्यांचे विविध अभिप्राय आलेले असुन त्या अनुषंगाने त्यांच्याविषयी अभिप्राया बद्दल मत मांडताना एक सुजाण पालक म्हणतो – 1 ) त्या एक उत्तम व आदर्श शिक्षिका आहेत. 2 ) त्या एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत 3 ) त्यांच्याकडे अध्यापन कौशल्य हे उत्कृष्ट दर्जाचे आहे 4 ) त्यांच्या अंगी विद्यार्थ्यांप्रती खूप मोठी तळमळ असून विद्यार्थ्यांना कसे घडवले पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखा त्यांच्यात गुण आहे 5 ) आपण एक शिस्तप्रिय शिक्षिका असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याचं कौशल्य आपल्यात आहे. 6 ) आपण आपल्या कौशल्याच्या व कर्तव्याच्या माध्यमातून चिखलाच्या गोळ्याला आकार कसा द्यायचा हे जसे कुंभाराच्या हातात असते तसा आकार देऊन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न सतत आपण करत असता. 7 ) चिखलाच्या दलदलीत जसे कमल फुलते तसे कमळाच्या फुलात सुगंध निर्माण करण्याचे काम आपण करता. 8 ) विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण प्रक्रियेत गुंतून न ठेवता त्यांच्यात सर्व गुणसंपन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न सतत आपण करत असता.9 ) आपल्यामध्ये असलेले विविध अंगी कौशल्य ही विद्यार्थ्यां मध्ये रुजवण्याचा प्रयत्न सतत आपला असतो. 11 ) आपण आपले कर्तव्य व अध्यापन करत असताना केवळ विद्यार्थी पुरते मर्यादित न राहता पालकांसोबत सतत संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल व अप्रगतीबद्दल रोखठोक भाष्य करून विद्यार्थ्यांन मध्ये परीपक्वता निर्माण करण्याचा प्रयत्न सतत आपण करता. 11 ) आपली शिक्षिकेची भूमिका ही निरपेक्ष व निपक्षपातिपनाची असून सर्व विद्यार्थ्यांना समान लेखण्याची एक उत्तम शैली आपल्यात आहे कुठल्याही जाती धर्माचा द्वेश हा आपल्यात कधीच पाहायला मिळाला नाही म्हणून आपण एक आदर्श शिक्षिका आहात. 12 ) शिक्षीका म्हणून काम करत असताना आपल्यामध्ये एक उत्तम शिक्षीका दडली असून तुमच्यात मात्रत्व , दात्रत्व आणि आईसारखं आईपण सुद्धा आपल्यात पाहायला मिळत. . अशा विविध गुणांनी नटलेली उत्तम व आदर्श शिक्षिका म्हणजे महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड येथील शिक्षीका होय , त्यांच्याविषयी लिहावे तेवढे कमीच आहे मी एक पालक म्हणून आपले विचार मांडले आहेत असे विचार अनेक बालकांचे व पालकांचे सुद्धा आहेत माझी मुलगी स्वजल जयवंत यानभुरे व मुलगा स्वराज जयवंत यानभुरे यांच्यात जो आपण आत्मविश्वास निर्माण केलात त्यामुळे ही दोन्ही मुले आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचे व आपले नाव कायमस्वरूपी गाजवत आहे. त्यामुळे आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कोव्हिड – 19 च्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत कायम आपण स्वतःला बांधून घेतले होते. आजही ऑफलाईन शाळा सुरू होऊन सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेणे , विद्यार्थ्यांच्या चुका काढणे विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा अभ्यासाची माहिती सांगून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणे अशा विविध महत्त्वपूर्ण बाबी आपण राबवत असतात म्हणून आपण एक आदर्श शिक्षिका असुन आपल्यात उत्तम मातृत्वाचा गुण पाहायला मिळतो. . बहुतेक आपण 30 जुलै 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात त्या अनुषंगाने आम्हा सर्व पालकांची व विद्यार्थ्यांची ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे की , आपले पुढील आयुष्य आनंदी व निरोगी आणि सुदृढ राहो व आपणास दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारची भावना आपल्य हाताखाली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून आज पाहायला मिळत आहे….. म्हणून सर्व विद्यार्थ्याकडून व त्यांच्या पालकाकडून एकच बाब पुढे येऊ लागली आहे सौ.विद्या स्वामी मॅडम म्हणजे एक उत्तम व आदर्श शिक्षिका होत.