दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.16 राहू येथील शंतनु रामचंद्र गाढवे याने रशियातील किरकिस्तान बिशेक येथे दि. १४ एप्रिल रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवत बाजी मारली आहे. बालेवाडी पुणे येथील धर्मवीर आखाड्याच्या दोन पहिलवानांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. शिर्डी येथे १९ ते २२ जानेवारी दरम्यान झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत धर्मवीर तालमीच्या शंतनू गाढवे याने ८० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते तर १०० किलो वजनी खुल्या गटातून शिवराज बालवडकरने रौप्य पदक पटकावले. या दोघांचीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. धर्मवीर आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय बालवडकर व वस्ताद पुणे केसरी समीर कोळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या शंतनु गाढवे यांने कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे परिसरातील कुस्तीप्रेमी शौकिनामधून कौतुक होत आहे. शंतनु हा राहुचे माजी सरपंच पै कैलास गाढवे यांचा पुतण्या असून शिक्षक रामचंद्र गाढवे यांचा मुलगा आहे.
उद्योजक शांताराम गिरमकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.