दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
मनमिळाऊ स्वभाव कर्तव्य दक्ष शाखा व्यवस्थापक श्री राहुल बेंदुले याची पदोन्नती वर शिरड शहापुर येथे बदली झाल्याने त्याचा छोटा खानी स्वागत समारंभ कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामीण बॅक येथे शनिवारी सायंकाळी शेतकरी, व्यापारी, हितचिंतक याच्या कडुन करण्यात आला.
राहुल बेंदुले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत एक वर्ष आॅफीसर तर तिन वर्षे शाखा व्यवस्थापक म्हणून बॅकेचे जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वी रीत्या पार पाडली त्यांनी अनेक गोर गरीब शेतकरी, व्यापारी, पुरूष बचतगट,महीला बचतगट,याना ग्रह कर्ज,छोटे दुकानदारी, उदोग करण्यासाठी सी. सी.बॅकेचे कर्ज देवुन अनेकांना व्यवसायाला लावले त्याच्या या कार्याची पावती म्हणून येथील बॅकेत रागच राग लागुन होती. भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल गरडे,
व्यापारी राजेश्वर तुप्तेवार, अनिल पांडे, सुनिल पवार, कृ.उ.बाजार समितीचे सचिव दिलीप रायपलवार,महाईसेवा केद्र चालक संजय लासीनकर,अजयपाल जाट,सुरेश पदमवार,शेतकरी दादाराव जाधव, पुजाराम टारपे,ओमाजी भुरके,मिलिंद भुसमवार, बंटी जयस्वाल, अरविंद राणे, मारोती जललवाड,रामप्रसाद जयस्वाल, गणेश जयस्वाल, राजु पदमवार माजी सरपंच रामराव जाधव,मारोती लोखंडे यांनी शाल, श्रीफळ, हार देवुन शाखा व्यवस्थापक बेंदुले याचा सहपत्निक सत्कार केला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे सहाय्यक व्यवस्थापक शुभम रामटेके, रोखपाल प्रसाद मुगटकर, कर्मचारी मोहन पाथोडे, उत्तम गायकवाड उपस्थित होते या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश जयस्वाल यांनी केले तर आभार सहाय्यक व्यवस्थापक शुभम रामटेके यांनी मानले.