दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.दि.14.4.2023 रोजी कै. उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालय बहाद्दरपुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमीत्त सलग 18तास वाचन हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रथम नागरीक सौ.गोदावरीबाई अर्जुन गायकवाड,तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम पा.पेटकर,ग्रामविकास अधिकारी गिरी,ग्रांम पंचायत सदस्य भिमराव कदम,ग्रां.प.सदस्य बालाजी तोटवाड,माजी उपसरपंच गुरुनाथ पा.पेठकर,बालाजी राव पा.पेठकर,अॅड.शिवचरन भांगे,अॅड.बालाजी कांबळे, वाचनालयाचे सचिव प्रदीप इंदुरकर, श्रीराम वनंजे,मोकींद खरात,संजय फुलवळे, इत्यादि उपस्थित होते.
सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन बालाजी पा.पेठकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी आपल्या मनोगतात कै.उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालयात सतत 18 तास वाचन या उपक्रमाचे कौतुक केले.या वाचनालयात आज प्रर्यंत अनेक उपक्रम राबवीत ते यशस्वी पार पाडले आहेत.या उपक्रमातु विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे म्हटले.
सतत 18 तास वाचन या प्रसंगी वाचक म्हनून विवेक गुरुनाथ एमेकर,सूधांशु संजय एमेकर, गणेश नामदेव नामपाठक,शौर्य दिपक श्रीवास्तव,यांचा सत्कार करण्यात आला.
वाचनालयाचे ग्रंथपाल श्री संजय एमेकर यांनी आभार प्रदर्शन केले.